लोकलमध्ये रिल बनवताना तरुण जखमी

नवी मुंबई : सध्या सोशल मीडियावर रील्स बनवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. मात्र ही स्पर्धा कधी कधी जीवावर देखील बेतत असते. असाच एक प्रकार रविवारी नेरूळमध्ये घडला आहे.

नेरूळ रेल्वे स्टेशनजवळील उभ्या असलेल्या रेल्वेवर एका १७ वर्षीय मुलाचा स्टंट करताना ओव्हरहेड वायरला हात लागल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे. हा मुलगा कोपरखैरणे येथील रहिवासी असून त्याला पुढील उपचारासाठी नेरूळमधील डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.