ठाणे: काही टॅक्सी कंपन्यांनी मधल्या काळात ऑटोरिक्षा-टॅक्सी चालकांना प्रलोभनं दाखवून प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे आकारून सेवा पुरविण्याच्या नावाखाली लूट चालविली होती आणि ती सुरूच आहे. अशा प्रकारच्या भाडे आकारणीला कायद्याने परवानगी नाही. परंतु, ती बिनदिक्कत सुरूच आहे. यावर उत्तम तोडगा म्हणून ‘यात्री मित्र’ क्रांतिकारी मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले आहे.
काही टॅक्सी कंपन्यांनी मधल्या काळात ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांना प्रलोभनं दाखवून प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे आकारून सेवा पुरविण्याच्या नावाखाली लूट चालविली होती आणि ती सुरूच आहे. अशा प्रकारच्या भाडे आकारणीला कायद्याने परवानगी नाही. परंतु, ती बिनदिक्कत सुरूच आहे.अशातच मुंबई आणि ठाण्यातील ऑटोरिक्षा चालकांनी मीटरप्रमाणे देय भाडे एखाद्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून निर्माण केल्यास प्रवाशांना आणि ऑटोरिक्षा चालकांना देखील फायदेशीर ठरू शकेल, असे त्यांनी सांगितले. त्याच आधारावर मेटाडोन लॅब्स प्रा. लि. ह्या कंपनीने अभ्यासपूर्वक विकसित केलेल्या ‘यात्री मित्र’ ह्या ॲपचा सेवा सारथी ऑटोरिक्षा टॅक्सी व ट्रान्सपोर्ट युनियनमार्फत प्रचार व प्रसार करणार आहे. मेटाझेन लॅब्स प्रा.लि. ही कंपनी कायझेन इन्फोटेक सोल्युशन प्रा. लि. या कंपनीची सिस्टर कंपनी आहे. याच कंपनीने यापूर्वी भारत सरकारच्या आयकर विभागासाठी, मुंबई पोर्ट ट्रस्ट, ठाणे महापालिका, रोटरी इंटरनॅशनल यांसाठी मोबाइल ॲप्स विकसित केली आहेत.
सेवा सारथी आणि मेटाझेनकडून सुरुवातीच्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यातील नोंदणीकृत रिक्षाचालकांना यात्री मित्र ॲपबद्दल योग्य ते प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच हे ॲप रोज वापरणाऱ्या चालकांना वैयक्तिक अपघाती विमा कवच देण्यात येईल. या ॲपमुळे कोणतेही कमिशन न देता संपूर्ण भाडे रिक्षाचालकाला मिळणार आहे. त्वरित पेमेंट मिळणार असून चालकांना वैयक्तिक अपघात विमा मिळणार आहे. प्रवाशांना मीटरमध्ये दाखवलेलेच भाडे द्यावे लागेल. इच्छितस्थळी जाण्यासाठी ॲपच्या माध्यमातून ऑटोरिक्षा उपलब्ध होणार आहेत. प्रवाशांच्या इच्छेनुसार कोठेही थांबता येणार आहे.
२६ जूनपासून चालक व प्रवासी नोंदणी सुरू करण्यात आली असून १५ जुलैपासून ॲपचा वापर सुरू होणार आहे. ही सेवा सुरुवातीला मुंबई आणि ठाण्यात सुरू केली जाईल आणि नंतर मुंबई महानगर क्षेत्र तसेच महाराष्ट्रभर विस्तारित केली जाईल.