आज ठरेल दिल्ली कॅपिटल्ससोबत फायनल कोण खेळेल: मुंबई इंडियन्स की गुजरात जायंट्स?

सुमारे ७२ तासांनंतर पुन्हा एकदा त्याच ठिकाणी, मुंबई इंडियन्स या WPL २०२५ मध्ये शेवटचा सामना गुजरात जायंट्सशी करेल. गुरुवारी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर एलिमिनेटरसाठी दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील. या दोन्ही संघांसाठी करो की मरो सामना आहे. २०२३ मध्ये WPL चा पहिला हंगाम जिंकणारे मुंबई इंडियन्स यांना जर तीन आवृत्त्यांमध्ये दुसरी फायनल खेळायची असेल तर गुजरात जायंट्सवर मात करावी लागेल. तसेच WPL मध्ये पहिल्यांदाच प्ले-ऑफसाठी पात्र ठरलेल्या गुजरात जायंट्सला प्रथम एलिमिनेटर जिंकून नंतर दिल्ली कॅपिटल्ससोबत फायनल खेळण्याची सुवर्ण संधी आहे.

 

आमने सामने

मुंबई इंडियन्सने सहापैकी सहा सामन्यात गुजरात जायंट्सना नमवले आहे.

 

संघ

मुंबई इंडियन्स: अमनजोत कौर, अमिलिया कर, क्लोई ट्रायॉन, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, जिंतिमनी कलिता, नॅट सिव्हर-ब्रंट, सायका इशाक, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), शबनीम इस्माईल, एस सजना, अमनदीप कौर, कीर्थना बालक्रिष्णन, जी कमलिनी (यष्टीरक्षक), संस्क्रीती गुप्ता, अक्षिता माहेश्वरी, नदिन डी क्लर्क

गुजरात जायंट्स: ॲश्ले गार्डनर (कर्णधार), बेथ मुनी (यष्टीरक्षक), दयालन हेमलथा, हरलीन देओल, लॉरा वूल्फार्ट, शबनम शकील, तनुजा कंवर, फिबी लिचफिल्ड, मेघना सिंग, काशवी गौतम, प्रिया मिश्रा, मन्नत कश्यप, सायली सातघरे, सिमरन शेख, डिआंड्रा डॉटीन, प्रकाशिका नाईक, डॅनिअल गिब्सन

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

नॅटली सिव्हर-ब्रंट: या इंग्लिश अष्टपैलू खेळाडूने या WPL २०२५ मध्ये एकही पाऊल चुकीचे टाकलेले नाही. ती या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे आणि आठ सामन्यांमध्ये ६९ च्या दमदार सरासरीने ४१६ धावा करून ऑरेंज कॅपधारक आहे. हे विसरू चालणार नाही की तिने आठ डावांमध्ये आठ विकेट्स घेतल्या आहेत.

अमिलिया कर: न्यूझीलंडची लेग स्पिनर ही तिच्या सहकारी हेली मॅथ्यूजसह WPL २०२५ मध्ये संयुक्तपणे सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज आहे. करने १४ विकेट्स पटकावल्या आहेत, ज्यामध्ये एक फायफरचा समावेश आहे. ती प्रत्येक डझन चेंडूवर विकेट घेते. याशिवाय, कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची तिची क्षमता दुर्लक्षित करू शकत नाही.

अ‍ॅशले गार्डनर: गुजरात जायंट्सची कर्णधार या WPL २०२५ मध्ये तिच्या संघासाठी सर्वात यशस्वी फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाच्या या धडाकेबाज उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने १६३ च्या स्ट्राईक रेटने २३५ धावा केल्या आहेत. ऑफ स्पिन गोलंदाजीकरत तिने आठ बळी घेतले आहेत.

काशवी गौतम: गुजरात जायंट्सची ही उजव्या हाताची वेगवान गोलंदाज या स्पर्धेत तिच्या संघासाठी आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. तिने आठ सामन्यांमध्ये प्रति षटक सहा धावांपेक्षा कमी इकॉनॉमीने १० विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या तिच्या मागील सामन्यात तिला फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्या सामन्यात तिने १० धावा केल्या.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: मार्च १३, २०२५

वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता

ठिकाण: ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई

प्रक्षेपण: जिओहॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स नेटवर्क