२ ऱ्या MCA वूमेन्स क्रिकेट लीगमध्ये वैभवी राजाने झळकावले शतक

वैभवी राजाचे धडाकेबाज शतक व्यर्थ गेले कारण बुधवारी माटुंगा जिमखाना येथे खेळल्या गेलेल्या २ ऱ्या MCA वूमेन्स क्रिकेट लीगच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात माटुंगा जिमखाना MIG क्रिकेट क्लबकडून १२ धावांनी पराभूत झाला.

विजयासाठी ४० षटकांत २३० धावांचा पाठलाग करताना माटुंगा जिमखाना हे लक्ष्य गाठण्यासाठी योग्य मार्गावर होते. त्यांची कर्णधार वैभवी आघाडीवर होती, जिने फलंदाजीची सलामी दिली आणि ११४ चेंडूत ११७ धावा केल्या. या उजव्या हाताच्या फलंदाजाचा डाव १७ चौकारांनी सजला होता. तिचा शानदार प्रयत्न धावबाद होऊन संपुष्टात आला. माटुंगा जिमखाना ४० षटकांत सात गडी बाद २१७ धाव करू शकले.

घाटकोपरची रहिवासी असलेली वैभवी डोंबिवलीत हृषीकेश पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट एक्स्प्लेन्ड अकादमीमध्ये प्रशिक्षण घेते.

माटुंगा जिमखाना शुक्रवारी त्यांच्या होम ग्राऊंडवर या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत नॅशनल क्रिकेट क्लबविरुद्ध खेळणार आहे.