राज्यस्तरीय कराटे स्पर्धा
ठाणे : मुलुंड येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे असोसिएशन ऑफ इंडियाच्या चौदा वर्षाखालील कराटे स्पर्धेत ठाण्यातील कोलशेत येथील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश मिळवले.
या स्पर्धेत यश जैसवाल याने उल्लेखनीय कामगिरी करत त्याच्या दोन गटांमध्ये सुवर्णपदके पटकावली आहेत. प्रशिक्षक तेजस गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या जैसवाल याने काता आणि कुमीते या दोन्ही प्रकारात यश मिळवत प्रेक्षक आणि परीक्षकांची मने जिंकली.
संघाच्या या यशाचे सर्वांनी कौतुक केले. आमच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी खूप कष्ट घेतले आहेत, आणि त्यांची मेहनत आज फळाला आली आहे,हे यश केवळ जिंकण्यासाठी नाही तर आत्मविश्वास, सन्मान आणि जिद्द वाढवण्यासाठी आहे.”असे न्यू होरायझन शाळेच्या मुख्याध्यापिका मनी श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले.