डोंबिवली : पश्चिम विभागातील एका इमारतीमधील सदनिकेची कर आकारणी करून देण्याकरिता लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली.
कल्याण डोबिवली महानगरपालिका ह प्रभाग क्षेत्र कार्यालयातील करविभाग शिपाई योगेश महाले आणि ह प्रभाग क्षेत्रातील सेवानिवृत्त कामगार सूर्यभान कर्डक या दोघांना 50 हजार रुपयांची लाच घेतांना सापळा रचून रंगेहाथ पकडले.
दोन्ही आरोपींनी मंगळवारी डोंबिवली पश्चिमेतील एका इमारतीमधील सदनिकांना कर आकारणी करून देण्याकरिता प्रत्येक सदनिकामागे तीन हजार रुपये प्रमाणे ३६ फ्लॅटसाठी एक लाख आठ हजार रुपये रकमेची मागणी केली. या रकमेपैकी ५० हजार रुपये लाच स्वीकारली असता आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
ही कारवाई सुनिल लोखंडे (पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र), महेश तरडे (अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र), सुधाकर सुरडकर (अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र), तपासी अधिकारी विलास मते (पोलीस निरीक्षक, एसीबी, ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास मते, ला.प्र.वि., ठाणे .स.फौ. भावसार, पो. हवा. सचिन मोरे, पो.हवा. रामचंद्र लोटेकर, पो.हवा. मच्छिंद्र पोटे, स.पो.उप.निरी चौधरी (चालक ) यांनी कारवाई केली.