ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिचे तिहेरी यश

ठाणे : नवव्या `डेरवण यूथ गेम्स अॅथलेटिक्स’ स्पर्धा ७ ते १० मार्च २०२३ दरम्यान चिपळूण येथील डेरवण येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकूण सर्व खेळ प्रकारांत पाच हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

या स्पर्धेमध्ये ठाण्याच्या युनिव्हर्सल हायस्कूल, ब्रम्हांडमध्ये इ. ८ वीत शिकणाऱ्या शौर्या अंबुरे हिने ६० मी., १०० मी. आणि १५० मीटर धावणे या तिन्ही शर्यतीत १४ वर्षे वयोगटात सुवर्णपदक प्राप्त करून हॅटट्रिक नोंदवली आहे. १०० मी. धावणे स्पर्धा तिने 12.7 सेकंदात पूर्ण केली. या स्पर्धेत  शौर्या वेगवान धावपटू ठरली. यापूर्वी तिने सीआयएससीई या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेतही घवघवीत यश मिळवले आहे.

शौर्या अंबुरे (१३) हि युनिव्हर्सल हायस्कूल, ठाणे या शाळेची विद्यार्थिनी आहे. तसेच तिचे ॲथलेटिक्स प्रशिक्षण मागील आठ वर्षांपासून एम स्पोर्ट्स एंड फिटनेस, ठाणे येथे चालू असून प्रशिक्षक डॉ. अजित कुलकर्णी हे तिचे मार्गदर्शक आहेत. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत एसव्हीजेसीटीच्या क्रीडासंकुलात अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, नेमबाजी, फुटबॅाल अशा विविध खेळांचे सामने रंगले होते.