ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभांऐवजी पक्षाच्या शाखांना भेटी देण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, उद्या गुरुवार ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ठाण्यातील मनसेच्या उमेदवारांच्या पक्ष कार्यालय व शाखेला भेट देणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या खेपेला ठाण्यात चमत्कार घडवण्याचा चंग बांधला आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला कडवी टक्कर देण्यासाठी मनसेने २८ सुशिक्षित मराठी उमेदवार मैदानात उतरवले आहेत. ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या ह्या शिलेदाराना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः राज ठाकरे व्यक्तीशः उमेदवारांना भेटण्यासाठी ठाण्यात येत आहेत. सायंकाळी ५ वाजल्यापासून राज ठाकरे यांचा दौरा प्रारंभ होणार आहे.