कल्याण: कल्याण पश्चिमेतील गंधारी परिसरात मुन्ना गँरेज येथे नागाच्या दंशाने तीन कुत्रे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. सर्पमित्राने घटनास्थळी धाव घेत विषारी नागाला पकडून जीवनदान दिले.
कल्याण पश्चिमेतील मुन्ना गँरेज येथे सोमवारी गँरेजमालक मुन्ना यास दुपारी साडेतीनच्या सुमारास साडेपाच फुटी नाग दिसल्याने मुन्ना आणि हेल्परसह उपस्थितांची भितीने धादंल उडाली.
मुन्ना यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याशी संपर्क साधला असता सर्पमित्र बोंबे यांनी तातडीने घटनास्थळी पोहचत साडेपाच फुटी विषारी नागाला पकडले. नागाला पकडल्याचे पाहता उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान विषारी नागाला पाहताच दोन तीन कुत्रे आणि नाग यांच्यात संघर्ष झाला. कुत्र्यांना नागाने केलेल्या दंशामुळे तीन कुत्रे मृत्यूमुखी पडल्याचे दत्ता बोंबे यांनी सांगितले.