झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली ‘शिवा’ ही मालिका प्रत्येक भागात एक मनोरंजक वळण घेत आहे. आशु आणि शिवाची जोडी प्रेक्षकांना भावते आहे, तसेच शिवा आणि तिची पाना गँग मालिकेत मजा आणत आहे. येणाऱ्या भागात प्रेक्षक पाहू शकतील दिव्याला भेटून आशुतोषच्या कुटुंबातील सगळे प्रभावित होतात. आशुतोष आणि दिव्याच्या साखरपुड्याबद्दल शिवाला कळत. त्यात वंदनाचे वागण शिवाला भावनिक बनवतं. शिवा आपल्या मनातल्या वेदना मित्रांसमोर व्यक्त करते तेव्हाच आशुतोषने लिहिलेली कविता शिवाच्या हातात पडते. हे सर्व घडत असताना आशु आणि शिवा मध्ये एक नवीन नातं तयार होण्याची आशा दिसते. आशूच्या कवितेने शिवाच्या मनात नवीन भावना निर्माण होतात. असं काय आहे आशुतोषच्या कवितेत? शिवा आणि आशुतोष मध्ये मेत्रीच नातं निर्माण होईल का? दिव्या आणि आशुतोषच्या नात्याचं काय आहे भविष्य? हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल ‘शिवा’ च्या येणाऱ्या भागात तेव्हा बघायला विसरू नका ‘शिवा’ सोमवार ते शनिवार रात्री ९:०० वा फक्त झी मराठी वाहिनी वर.