नातं हे प्रेमाच, नुसत्या नजरेनेच जुळतं!! सगळ काही मनातल न बोलताच समजतं !!काही ना प्रेम शब्दात व्यक्त करता येत तर काही जण कृतींनी ते व्यक्त करतात. आज झी मराठीचे नायक व्यक्त करणार आहेत त्यांच्या प्रेमाची भाषा.
‘शिवा‘चा आशु म्हणजेच शाल्व किंजवडेकर जो चॉकलेट बॉय म्हणून ही ओळखला जातो त्याची प्रेम व्यक्त करण्याची भाषा एकदम आगळी वेगळी आहे. शाल्वने सांगितले,” हा व्हॅलेंटाईन माझ्यासाठी खूप खास आहे कारण माझी मालिका व्हॅलेंटाईनच्या दोन दिवस आधी १२ फेब्रुवारीला प्रसारित होतं आहे. त्यासोबत माझी एंगेजमेंट ऍनीव्हर्सरी ही १२ फेब्रुवारीलाच असते तर मी खूप उत्सुक आहे. मला माझ्या प्रेमाच्या व्यक्तींना जेवण बनून खायला घालायला खूप आवडत. जेव्हा मला वेळ मिळतो मी काहीतरी खास बनवून प्रेझेन्ट करतो. त्यासोबत मला वाटतं की नात्यांमध्ये समज असली पाहिजे त्यांनी खूप काही सरळ होऊन जातं. माझ्या जीवनातल्या खास व्यक्तीला एक निरोप आहे की बाबांनी बनवलेले सगळे मफीन मुंबईला येताना घेऊन ये आणि ते सगळे मी खाणार आहे तुला एखादा-दुसरा देईन हा विनोदाचा भाग. पण हैप्पी ऍनीव्हर्सरी!
‘तुला शिकवीन चांगलाच धडा‘ मधील अधिपती म्हणजे हृषिकेश शेलारने सांगितले, “मला माझ्या प्रिय व्यक्ती बरोबर वेळ घालवायला आवडतो आणि माझा नेहमी प्रयत्न असतो की किती ही व्यस्त असलो तरी मी माझ्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढतो. कारण मटेरिअलिस्टिक गोष्टीं पेक्षा आठवणींचा साठा मोलाचा असतो . नात्यामध्ये स्वातंत्र्य असणं खूप गरजेचं आहे. मी माझ्या त्या खास व्यक्तीला हेच सांगेन की नेहमी तुझ्यासाठी आणि तुझ्यासोबत खंबीर उभा असेन.
‘अप्पी आमची कलेक्टर‘ मालिकेच्या अर्जुन म्हणजे रोहित परशुरामने त्याची प्रेमाची भाषा व्यक्त करताना म्हणाल, खरंतर “प्रेम व्यक्त करायला लागलंच नाही पाहिजे. ते आपल्या वागण्याबोलण्यातून दिसतं. जेव्हा तिची मासिकपाळी वेळी तेव्हा मी सकाळी तिच्या आधी उठून एक कप चहा बनवून सोबत थोडा केक अशी डिश सजवून तिच्यासमोर धरली की पुढचे चार दिवस तिचे खूप छान जातात. प्रत्येक वेळी I love you म्हणूनच प्रेम व्यक्त करायची गरज नसते. पाण्याचा २० लिटरचा जार तिने न सांगता हंड्यात ओतून दिला तर I love you पेक्षा जास्त प्रभाव करतो हे मी अनुभवावरून सांगतो. हा ! हा ! हा ! मालिका करणाऱ्या आर्टिस्टचे असे काही स्पेशल प्लान्स नाही बनत कारण अर्जुनवर आणि ‘अप्पी आमची कलेक्टर’ वर अपार प्रेम करणारे चाहते रोज एपिसोडची वाट पाहत असतात तर त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देणंही मी माझं कर्तव्य मानतो. माझ्या २०० पिढ्यांनी बुधवारचा उपवास केला असेल तर ह्या १४ फेब्रुवारीच्या बुधवारी शूटला सुट्टी मिळेल. सुट्टी मिळाली तर तेच खूप मोठं गिफ्ट असेल बाकी केक तर कापुच. शेवटी पूजाला फक्त एक निरोप द्यायचा आहे की तू जशी आहेस तशीच कायम रहा !! तुझ्यात मला माझं बाळ दिसतं !
‘सारं काही तिच्यासाठी‘ मध्ये निशी आणि नीरजची प्रेम कथा खूपच गाजत आहे. तर जेव्हा नीरज गोस्वामीशी बोलणं झाले कि त्याची प्रेमाची भाषा काय आहे तेव्हा नीरज म्हणाला, ” पटकथा लेखनामध्ये एक म्हण आहे की ‘कॅरॅक्टर इज ऍक्शन’. माझं असं मत आहे प्रेम आहे हे बोलण्यापेक्षा, तुमच्या वागणुकीत दिसून आलं पाहिजे. १०० वेळा I love you बोलणं सोप्प आहे. पण जेव्हा मतभेद होतात तेव्हा तुम्ही ते कश्याप्रमाणे सोडवता ते खूप काही सांगून जातं तुमच्या नात्या बद्दल आणि माझ्यासाठी ते महत्वाचे आहे. माझ्या जीवनातल्या त्या खास व्यक्तीला निरोप देताना मी फक्त इतकंच सांगेन आपल्याला खूप चांगल्यागोष्टी अनुभवायच्या आहेत, दुनिया बघायची आहे, खूप शिकायचं आहे तर माझ्यावर विश्वास ठेव. आपण स्मरणात ठेवण्यासारखे आणि जपण्यासारखे जीवन बनवूया. व्हॅलेंटाईन डे हा प्रतीकात्मकपणे आपल्या प्रियजनांसोबत घालवण्याचा दिवस आहे आणि माझे प्रेम हे माझं काम आहे त्यामुळे मला आशा आहे की त्या दिवशी मी ‘सारं काही तिच्यासाठीच’ शूटिंग करत असेन.
तेव्हा पाहायला विसरू नका ‘अप्पी आमची कलेक्टर‘ संध्या ७ वा. ,’तुला शिकवीन चांगलाच धडा‘ रात्री ८ वा, ‘सारं काही तिच्यासाठी‘ रात्री ८:३० वा, आणि नवी मालिका ‘शिवा‘ १२ फेब्रुवारीपासून रात्री ९ वा.