मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशाला शिखरावर नेले

खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून अर्थसंकल्पीय भाषणात कौतुक

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. विकासाची गंगा आज देशात वाहत असून शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना संसदीय दलाचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने शिवसेनेतर्फे खासदार नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे कौतुक केले. तर गदारोळ घालण्राया विरोधकांवर घणाघाती टीका केली.

नवी दिल्ली येथे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून 2025- 26 सालातील अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्यातील पुरक अनुदानाच्या मागणीच्या विषयावर बोलताना शिवसेना पक्षातर्फे खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत पक्षाची भूमिका मांडली.

अर्थसंकल्पात शेतकारी आणि सर्वसामान्य जनेतच्या कल्याणासाठी भरीव तरतूद केली आहे. शहरी आणि ग्रामीण भागाचा समन्वय साधत विकासकामांसाठी 11 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यांना संकटकालीन परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी 6500 कोटींची तरतूद केली गेली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत अनुसूचित जातीसाठी 13 हजार 641 कोटींची तर अनुसूचित जातीसाठी 10 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची तरतूद केली असून निश्चितच ही उल्लेखनीय बाब असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा दिला आहे. तर युनोस्कोच्या माध्यामातून राज्यातील 12 गड-किल्ले यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट केले गेले आहेत. यामुळे आज राज्याचा इतिहास, वैभव जागतिक नकाशावर आले आहे, ही गौरवाची बाब असून खासदार नरेश म्हस्के यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले.

केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरिबांसाठी 4 कोटी पक्की घरे बांधली. जलजीवन मिशन अंतर्गत 5 वर्षांत 12.5 कोटी नवीन घरांना पाईप लाईनच्या माध्यामातून स्वच्छ पाणी पुरवठा केला गेला. उज्ज्वला योजने अंतर्गत आतापर्यंत 10 कोटी पेक्षा अधिक कुटुंबांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिले गेले आहेत. डीबीटी योजनेच्या माध्यमातून 6.75 लाख कोटी रुपयांची रक्कम लाभार्थींच्या खात्यात थेट जमा केली गेली आहे.देशात 2025 मध्ये 1 हजार किलो मिटरचे नेटवर्क टाकण्यात आले असून माझ्या ठाणे लोकसभा क्षेत्राचाही यात समावेश आहे. आज ठाणे-मुंबई हे मेट्रोने जोडले जात असून नागरिकांचा प्रवास सुसह्य होणार आहे. आज देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा मजबूत असल्याने नक्षलवादी आणि दहशतवाद्यांचा बिमोड झाला आहे. 2027 सालापर्यंत भारत देश हा विकसीत देश म्हणून नावाला येईल यात तिळमात्र शंका नसल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.