दादोजी कोंडदेव स्टेडियमवर तन्मयी आणि कुसुमची शतके

तन्मयी बेहेरा आणि कुसुम तिरिया

शतकवीर तन्मयी बेहेरा आणि कुसुम तिरिया यांनी ओडिशाला रविवारी वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफीच्या सामन्यात ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम वर मिझोरामवर 301 धावांनी विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करताना, बेहेराच्या (104 चेंडूत 126 धावा) आणि तिरियाच्या (109 चेंडूत 110 धावा) शानदार खेळीच्या जोरावर ओडिशाने 50 षटकांत चार विकेट्सच्या मोबदल्यात 346 धावा केल्या. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 196 धावांची भागीदारी करत मिझोरामच्या गोलंदाजांना चकवा दिला. रिन मावी (1/50) आणि संध्या राय (1/28) व्यतिरिक्त, मिझोरामसाठी इतर कोणत्याही गोलंदाजाला एकही बळी घेता आला नाही.

प्रत्युत्तरात मिझोरामचा डाव 39 षटकांत 45 धावांत गारद झाला. मिझोरामसाठी राय (61 चेंडूत 18 धावा) ही एकमेव फलंदाज होती जिने दोन अंकी धावा केल्या. ओडिशासाठी सुश्री अनिता सिंग ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली कारण तिने पाच षटकात एकही धाव न देता तीन बळी घेतले. गोलंदाज तरण्णा प्रधान (2/12) आणि सोनाली हेमब्रम (2/19) यांनीही चांगले प्रदर्शन केले.

दादोजी कोंडदेव स्टेडियमवर वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफीचा पुढील सामना होणार मिझोराम आणि सिक्कीम यांच्यात मंगळवारी होणार आहे.