अभ्युदय बँकेने 48व्या ठाणेवैभव क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी सेंट्रल मैदानावर व्होल्टासविरुद्ध 216 धावांनी यशस्वी बचाव केला. प्रथम फलंदाजी करताना सचिन टेंभे (39 चेंडूत 53 धावा) याच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर अभ्युदय बँकेने 35 षटकांत सात गडी बाद 216 धावा केल्या. सलामीवीर राजेश विचारे (53 चेंडूत 34 धावा) याने चांगली सुरुवात दिली...