ठाणे : ठाणे भूषण पुरस्काराचे मानकरी आणि गुजरातचे रणजीपटू तुकाराम सुर्वे यांचे आज ठाणे मुक्कामी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात क्रिकेटपटू अतुल आणि कन्या असा परिवार आहे. तुकाराम सुर्वे हे १९१५ साली स्थपन झालेल्या ठाणे फ्रेंड्स युनियन आणि मफतलाल क्रिकेट क्लबचे ते कार्यवाहक होते. मुंबई क्रिकेट संघटनेच्या...