कल्याण : येथील गिर्यारोहक संस्था सह्याद्री रॉक एडवेंचर्स यांच्या स्वयंसेवकांनी मनमाड येथील प्रसिद्ध थम्सअप सुळका म्हणजेच हडबीची शेंडी अवघ्या ७५ मिनिटात सर करत देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करून देशाप्रती आदर व्यक्त केला. सोबतच देशाचे राष्ट्रगीत सुळक्यावर गाऊन एक अनोख्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या....