संकेत कदमच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर सारस्वत बँकेने बुधवारी ४८ व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर टाइम्स ऑफ इंडियाला पाच गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना टाइम्स ऑफ इंडियाचा संघ २४.५ षटकांत ९० धावांवर बाद झाला. कर्णधार शेखर कदम (४७ चेंडूत ३२ धावा) आणि अमेय महांबरे (२१...