स्वप्न जरी सचिन अथवा विराट होण्याचे असले तरी ते साकार होणार नसते आणि याची पूर्ण खात्री असली तरी क्रिकेटवर ‘एक्सपर्ट कॉमेन्ट’ करण्याचे किंवा गेला बाजार घरासमोरच्या गल्लीत या लोकप्रिय क्रीडा प्रकारातील आपले नैपुण्य तपासून बघण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही! सिझन बॉलने खेळण्यात जी जोखिम आहे ती टेनिस बॉलमध्ये नाही...