आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या भारताच्या हृदयद्रावक पराभवाच्या जखमा चाहत्यांच्या मनात अजूनही ताज्या असताना, खेळाडूंना मात्र त्यांच्या पुढील असाइनमेंटसाठी सज्ज व्हावं लागेल. २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार्या पाच टी २० सामन्यांच्या मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. पहिला सामना डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे...