शहापूर: मुंबई-नाशिक महामार्गावरील खर्डी वनपरिक्षेत्रात लागवड केलेली रान आवळ्यांची रोपे मोठी होत आहेत. कागदोपत्री झाडांच्या देखभालीसाठी खर्च दाखवण्यात येत असला तरी वनविभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असून वणव्यांमुळे ही झाडे जळून नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे. आवळ्याचे झाड चढायला कठीण, बारीक खोडाचे असते आणि फळे उंच फांद्यावर लागतात. त्यामुळे...