४८ व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर बुधवारी रूट मोबाईलने डीएमसीसीवर एकतर्फी सामन्यात सात गडी राखून विजय नोंदवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय डीएमसीसीने घेतला. परंतु हा निर्णय चुकीचा ठरला कारण त्यांचे फलंदाज फार काही योगदान करू शकले नाही. ते झटपट मैदानावर आले आणि गुणविश्लेषकाला जास्त...