मुंबईची कर्णधार हुमैरा काझीचे अर्धशतक आणि अष्टपैलू सायली सातघरेची उत्कृष्ट खेळी यांच्या मदतीने मुंबईने, सोमवारी, नवी दिल्लीतील सेंट स्टीफन मैदानावर पंजाबचा पाच गडी राखून पराभव केला. सिनियर वूमेन्स वने डे ट्रॉफीचा सामना खेळताना, पंजाबने प्रथम फलंदाजी करत, सलामीवीर रिधिमा अग्रवाल (८५ चेंडूत ६९ धावा) आणि मधल्या फळीतील फलंदाज परवीन...