सिनियर वूमेन्स वन डे ट्रॉफीमध्ये रविवारी एअरफोर्स कॉम्प्लेक्स ग्राउंड, पालम II, नवी दिल्ली येथे, मुंबईने हैदराबादचा अवघ्या दोन धावांनी पराभव करून नॉक आऊट फेरीसाठी पात्र ठरले. धुक्यामुळे उशीरा सुरु झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ३५ षटकात आठ बाद १८२ धावा केल्या. सलामीवीर रिया चौधरी (५७ चेंडूत ५० धावा) आणि कर्णधार हुमैरा काझी...