ठाणे: `क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’ यांच्या वतीने शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेल्या `गृह उत्सव : प्रॉपर्टी २०२४’ प्रदर्शनाला नागरिकांची पसंती मिळत असून, दुसऱ्या दिवशी घर घेणाऱ्या इच्छूक कुटुंबांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. ठाणे शहरातील मध्यवर्ती भागापासून निसर्गसौदर्य लाभलेल्या परिसरातील घरांचा प्रदर्शनात समावेश आहे. त्यात परवडणाऱ्या घरांपासून उच्च जीवनशैलीतील घरे नागरिकांना पाहावयास...