सेंट्रल मैदानावर 48व्या ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी बिनेट कम्युनिकेशनने एकतर्फी झालेल्या सामन्यात मालवणी कट्टा संघाचा सात गडी राखून पराभव केला. बिनेट कम्युनिकेशनने मालवणी कट्टाला 18.1 षटकात 84 धावांत स्वस्तात बाद केले. सागर मुळे आणि सिद्धार्थ घुले यांनी प्रत्येकी चार बळी घेत मालवणी कट्ट्याची फलंदाजी उद्ध्वस्त केली. मुळे...