कर्णधार शशिकांत कदमच्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ठाणे महानगरपालिकेने 48 व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर शुक्रवारी एल & टी संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत ठाणे महानगरपालिकेने एल & टी संघाला 34.2 षटकात 163 धावांवर गुंडाळले. नंदन कामथ (3/20)...