ठाणे: प्रत्येक ग्रामपंचायतीने विहीरी खोदण्याचे कमीतकमी 15 प्रस्ताव तरी पाठवावेत, अशा सक्त सूचना राज्य शासनाने जिल्हा परिषदांना दिल्या आहेत. त्यात ठाणे जिल्हा परिषदेचाही समावेश असल्याची माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या म्हणण्यानुसार यावर्षी राज्यात दुष्काळ असल्यामुळे शेतक-यांचे लक्ष हे विहीर खोदाईकडे जास्त प्रमाणात राहील. अशा परिस्थितीमध्ये अधिकाधिक...