ठाणे: एरव्ही वर्षभर पाणी टंचाईची झळ बसणाऱ्या घोडबंदर परिसरात स्टेमच्या दुरुस्तीमुळे सध्या कोरडा सप्ताह सुरू आहे. त्यामुळे येथील गृहसंकुलांसाठी रोज पाण्याचे किमान १५ टँकर पुरवावे लागत आहेत. एकूणच या परिसरात पाणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. देखभाल दुरुस्तीसाठी स्टेमने घेतलेल्या शुक्रवारच्या शटडाऊननंतरही घोडबंदर परिसराला गेल्या सहा दिवसांपासून पाणीबाणीला सामोरे...