तीनपैकी दोन वेळा जिंकलेला भारत १९ नोव्हेंबर रोजी चौथा विश्वचषक फायनल खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘मेन इन ब्लू’चा सामना होईल. अव्वल दर्जेच्या फॉर्ममध्ये असलेला भारत स्टेडियममधील १,३०,००० चाहत्यांच्या मोठ्या पाठिंब्याने मैदानात उतरेल. त्याचबरोबर त्यांचे जगभरात पसरलेले एक अब्ज चाहते अपेक्षेने सामना पाहतील. ५०...