ठाणे : मुंबई विद्यापीठ दूरस्थ शिक्षण (आयडॉल) प्रथम वर्ष/सत्र पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रम (एमएमएस) परीक्षेला ‘फायनान्शियल मॅनेजमेंट’ऐवजी ‘फायनान्शियल अकाऊंट’ची प्रश्नपत्रिका देण्याचा मोठा घोळ मुंबई विद्यापीठाने २३ जानेवारी २०२४ रोजी केला. ‘आयडॉल’च्या प्रथम वर्ष /सत्र व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी होऊ घातलेल्या परीक्षेला ‘फायनान्शियल मॅनेजमेंट सत्र दोनऐवजी फायनान्शियल अकाऊंट’ सत्र १ या विषयाची प्रश्नपत्रिका...