अभिमन्यू इसवरनचे शानदार अर्धशतक आणि आकाश दीप आणि शाहबाज अहमद यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर बंगालने बुधवारी मध्य प्रदेशला 193 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. विजय हजारे ट्रॉफीच्या या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत मध्य प्रदेशने बंगालला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर इसवरनने 95 चेंडूत 73 धावा करून...