ठाणे: धर्मवीर क्रीडा संस्था अंतर्गत शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन हॉलमध्ये पहिल्यांदाच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये ठाणे शहरातील अनेक खेळाडू सहभागी झाले होते. धर्मवीर क्रीडा संस्थेचे अध्यक्ष अशोक वैती यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या. सदर स्पर्धा ९ वर्षांखालील मुले व मुली, ११ वर्षांखालील मुले व मुली...