आयसीएसआय ठाणे शाखेच्या अध्यक्षपदी स्वाती निवळकर

ठाणे : सीएस स्वाती निवळकर यांची २०२४ सालासाठी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या ठाणे शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाली.

सीएस एस. एन. विश्वनाथन यांची उपाध्यक्षपदी, सीएस नचिकेत सोहनी यांची सचिवपदी आणि सीएस आशिता कौल यांची सचिवपदी निवड झाली. ठाणे शाखेच्या कोषाध्यक्षपदी निवड झाली. ठाणेवैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ, डॉ. रश्मी अग्निहोत्री, वाणिज्य विभागप्रमुख, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे यांची सहनियुक्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

राष्ट्रीय स्तरावर, २०२४ साठी सीएस बी. एन. नरसिहमन यांची अध्यक्षपदी आणि सीएस धनंजय शुक्ला यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष सीएस यतीन पंडित यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सीएस स्वाती निवाळकर यांच्याकडे सूत्रे सोपवली. त्यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.