स्वामींच्या देवत्वाला मिळणार आव्हान !

कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या लोकप्रिय मालिकेत स्वामींच्या दैवी लीला हा प्रेक्षकांसाठी दैवी अनुभूतीचा साक्षात्कार असतो, अशीच एक स्वामींची जगावेगळी लीला या मालिकेच्या रविवार २५ फेब्रुवारीच्या महारविवार मध्ये पाहायला मिळणार आहे.

गोविंदपंत हा स्वामींचा शोध घेणारा माणूस स्वामी स्थानावर येतो, मात्र स्वामींचे जगावेगळे रूप पाहून दावा करतो की की हे परब्रम्ह स्वरूप नाहीत तर अत्यंत सर्वसामान्य व्यक्ती आहेत. तसेच पुढच्या चोवीस तासात पाच गोष्टी पाच परीक्षा हे सिद्ध करतील असे जाहीर करतो. स्वामी त्याचे हे आव्हान स्वीकारतात आणि देवत्वाला आव्हान असलेल्या या पाच परीक्षा सुरू होतात. या पाच परीक्षा कोणत्या आणि या दैवी लीलेतून स्वामी कोणता संदेश देणार याची वेगळी उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
आजवर स्वामींच्या दैवत्वाला कधीही थेट आव्हान मिळालेले नाही परंतु आता ते गोविंदपंतानी दिले असून स्वामींनी ते स्वीकारले आहे, या आव्हानाला स्वामी सामोरे कसे जातील हे पाहण्यासाठी नक्की बघा, जय जय स्वामी समर्थ, २५ फेब्रुवारी, दु. २.०० वा. आणि रात्री ८.०० वा. आपल्याला लाडक्या कलर्स मराठीवर.