कल्याणमध्ये जीबीएसचा संशयित रुग्ण

कल्याण: कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात संशयित जीबीएस रूग्ण आढळला असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून रूग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकारी सूत्रांकडून माहिती आहे.

मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ल यांनी या निमित्ताने माहिती दिली की, गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराचा संशयित रूग्ण आढळला असून त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यानिमित्ताने नागरिकांना स्वच्छतेबाबत काळजी घेणे, हात स्वच्छ धुणे, तसेच कच्चे मांस, कच्चे अन्न खाऊ नये. आठवड्यापूर्वी अतिसार, अशक्तपणा जाणवत असेल तर वेळीच उपचार घेणे ही खबरदारी घ्यावी.