उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका हद्दीतील काही इमारती अतिधोकादायक असल्याचे दिसून आल्याने आज मनपा आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार प्रभाग समिती-४ क्षेत्रातील धोकादायक इमारती निष्कासित करण्यास सुरुवात केली आहे.
उल्हासनगर महापालिका हद्दीतील धोकादायक इमारतीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शहरात एकुण ३१६ धोकादायक इमारती पालिकेने घोषित केल्या असून सर्व इमारतींमधील रहिवाशांना अधिनियमातील तरतूदीनुसार सहायक आयुक्त यांच्यामार्फत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
प्रभाग समिती -४ च्या हद्दीतील मिनर्वा पॅलेस, हिललाईन पोलीस स्टेशनजवळ उल्हासनगर-५, येथील रूपानी महाल अपार्टमेंट, गंगासागर अपार्टमेंट, पवन धाम अपार्टमेंट कैलाश कॉलनी उल्हासनगर-५ या इमारती एक वर्षापूर्वी रिकाम्या करण्यात आल्या होत्या. येणारा पावसाळा लक्षात घेता इमारत कोसळून लगतच्या नागरिकांना धोका होऊ नये म्हणून आज मनपा आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशान्वये प्रभाग समिती ४चे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकासह इमारती निष्कासित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.