सेंट जोसेफ्स हायस्कूल डोंबिवलीच्या विहान आणि भूपेश यांनी दाखवली आपल्या फिरकीची कमाल

हॅरिस शिल्डच्या तिसऱ्या फेरीत डीजी खेतान इंटरनॅशनल हायस्कूलने सेंट जोसेफ्स हायस्कूल डोंबिवलीविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सेंट जोसेफ्स हायस्कूलसाठी गोलंदाजीची सुरुवात करताना, १४ वर्षीय ऑफस्पिनर विहान वाघने डीजी खेतान इंटरनॅशनल हायस्कूलच्या टॉप ऑर्डरला धक्का दिला जेव्हा त्याने तीन एलबीडब्ल्यू आऊट आणि एक क्लीन बोल्ड केले. त्याचबरोबर भूपेश पंचाक्षरी, जो सुद्धा एक १४ वर्षीय ऑफस्पिनर आहे त्याने मधल्या फळीतील तीन विकेट्स घेतल्या. विहान आणि भूपेश यांच्या उत्कृस्ट गोलंदाजीने विरोधी संघ केवळ ६६ धावा करून बाद झाला.

प्रत्युत्तरात, विहान वाघ (२३*) आणि कर्णधार आयुष आंबेकर (३३*) या सलामीच्या जोडीने अल्पशा लक्ष्य सहजतेने पार केले आणि त्यांच्या संघाला हॅरिस शिल्डमध्ये आणखी एक १० गडी राखून विजय मिळवून दिला. या स्पर्धेत सेंट जोसेफ्स हायस्कूल डोंबिवलीने आता सलग तीन सामने जिंकले आहेत.