जेव्हा ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान विरुद्ध ९१/७ वर झुंजत होता, तेव्हा विश्वचषकातील सर्वात मोठा ‘अपसेट’ होणे जवळजवळ अपरिहार्य होते. पाचवेळच्या विश्वविजेत्या संघाला आणखी २०१ धावांची गरज होती आणि त्यांच्या फक्त तीन विकेट्स शिल्लक होत्या. ‘ऑड्स’ नक्कीच अफगाणिस्तानच्या बाजूने होते. तथापि, “द बिग शो” या नावाने प्रसिद्ध असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने एक चमत्कारिक कामगिरी केली. त्याने नाबाद द्विशतक ठोकून आपल्या संघाला अभूतपूर्व विजय मिळवून दिला आणि अफगाणिस्तानच्या उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या अशांवर पाणी सोडलं.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाची ती कडू गोळी गिळून अफगाणिस्तान १० नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार्या शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढण्यासाठी स्वत: ला तयार करेल.
अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान एकमेकांविरुद्ध फक्त एक एकदिवसीय सामना खेळले आहेत. २०१९ च्या विश्वचषकादरम्यान तो इंग्लंडमध्ये खेळला गेला होता. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला नऊ गडी राखून पराभूत केले.
अफगाणिस्तान | दक्षिण आफ्रिका | |
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट) | ३ | ९ |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने | ० | १ |
विश्वचषकात | ० | १ |
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेची आतापर्यंतची कामगिरी
अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला नववा आणि शेवटचा साखळी सामना खेळतील. आठ सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिकेने सहा, तर अफगाणिस्तानने चार जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली आहे.
सामना क्रमांक | अफगाणिस्तान | दक्षिण आफ्रिका |
१ | बांगलादेशकडून ६ विकेटने पराभव | श्रीलंकेचा १०२ धावांनी पराभव |
२ | भारताकडून ८ विकेटने पराभव | ऑस्ट्रेलियाचा १३४ धावांनी पराभव |
३ | इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव | नेदलँड्सकडून ३८ धावांनी पराभव |
४ | न्यूझीलंडकडून १४९ धावांनी पराभव | इंग्लंडचा २२९ धावांनी पराभव |
५ | पाकिस्तानचा ८ विकेटने पराभव | बांगलादेशचा १४९ धावांनी पराभव |
६ | श्रीलंकेचा ७ विकेटने पराभव | पाकिस्तानचा १ विकेटने पराभव |
७ | नेदरलँड्सचा ७ विकेटने पराभव | न्यूझीलंडचा १९० धावांनी पराभव |
८ | ऑस्ट्रेलियाकडून ३ विकेटने पराभव | भारताकडून २४३ धावांनी पराभव |
संघ
दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को यानसन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रासी व्हॅन डर ड्युसेन, लिझाद विल्यम्स.
अफगाणिस्तान: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला ओमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.
दुखापती अपडेट्स
अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या सामन्यापूर्वी दुखापतीची चिंता नाही.
खेळण्याची परिस्थिती
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या स्पर्धेतील चौथा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी पहिल्या तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. येथे सर्वाधिक धावसंख्या २८६ आहे आणि सर्वात कमी १९१ आहे. वापरलेल्या खेळपट्टीच्या प्रकारानुसार (काळी माती किंवा लाल माती) परिस्थिती भिन्न असेल. लाल मातीच्या खेळपट्ट्या फिरकीपटूंना मदत करतात कारण चेंडू हळू आणि कमी बाउन्ससह बॅटवर येतो. काळ्या मातीच्या खेळपट्ट्या फलंदाजीसाठी अनुकूल असतात कारण चेंडूची गती आणि बाउन्स एकसमान असते.
हवामान
हवामानात धुके सूर्य दिसण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आवरण असणार नाही आणि पावसाची फक्त १% शक्यता आहे. ईशान्येकडून वारे वाहतील.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
क्विंटन डी कॉक: आठ सामन्यांत चार शतके झळकावणारा हा दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज भन्नाट फॉर्ममध्ये आहे. त्याने ६९ च्या कमालीच्या सरासरीने आणि १११ च्या स्ट्राईक रेटने एकूण ५५० धावा केल्या आहेत.
मार्को यानसन: ६.७५ फूट उंच असलेला, हा दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज त्याच्या संघासाठी आठ सामन्यांत १७ बळी घेऊन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. फलंदाजी करताना त्याची सरासरी ३९ आणि स्ट्राईक रेट १११ आहे. त्याच्या नावावर १५७ धावा सुद्धा आहेत.
इब्राहिम झद्रान: अफगाणिस्तानच्या उजव्या हाताच्या सलामीच्या फलंदाजाने गेल्या सामन्यात इतिहास रचला कारण तो विश्वचषकात शतक झळकावणारा देशाचा पहिला खेळाडू ठरला. त्याच्या आठ सामन्यांत त्याने ५२ च्या सरासरीने आणि ७८ च्या स्ट्राईक रेटने ३६१ धावा केल्या आहेत.
राशिद खान: हा अव्वल दर्जेचा अष्टपैलू अफगाणिस्तान संघाच्या हृदयाचा ठोका आहे. या चतुर लेग स्पिनरने त्याच्या आठ सामन्यांत नऊ विकेट्स घेतल्या आहेत आणि ११२ च्या स्ट्राइक रेटने पाच डावात ९१ धावा ठोकल्या आहेत.
आकड्यांचा खेळ
- कगिसो रबाडा त्याचा १०० वा एकदिवसीय सामना खेळणार आहे
- हेनरिक क्लासेन आणि तबरेझ शम्सी त्यांचा ५०वा एकदिवसीय सामना खेळतील
- टेंबा बावुमाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ११ धावांची गरज आहे
- केशव महाराजला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी १ विकेटची आवश्यकता आहे
- विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या एबी डीव्हिलर्स (४) च्या पुढे जाण्यासाठी क्विंटन डी कॉकला १ शतक आवश्यक आहे
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: १० नोव्हेंबर २०२३
वेळ: दुपारी २:०० वाजता
स्थळ: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)