ठाणे: ठामपा आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात घनकचरा विभागाला एका एजन्सीने थ्री स्टार दिले आहेत. या स्टार्सची विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी खिल्ली उडविली.
घनकचरा विभागाचे कौतूक व्हावे, हा एक विनोदच आहे. कारण, ठाणे शहरात कदाचित कचरा दिसत नसेल पण मुंब्रा, कौसा आणि दिवा भागात कचरा वहनाची व्यवस्थाच नसल्याने कचऱ्याचे ढिग लागलेले दिसत असतात. हे स्टार देताना एजन्सीने कोणत्या दुर्बिणीतून पाहिले असेल ती दुर्बिण आम्हालाही द्या, अशी टीका केली. 62 कोटींच्या ग्रीन कर्जरोख्यानंतर घनकचरा फाईव्ह स्टार होणार का, असा सवालही पठाण यांनी उपस्थित केला.