श्रीलंका खेळणार अभिमानासाठी, न्यूझीलंड खेळणार NRR सुधरवण्यासाठी

शनिवारी ‘अ’ गटातील दोन संघ, न्यूझीलंड आणि श्रीलंका एकमेकांविरुद्ध शारजाहमध्ये खेळणार आहेत. दोन्ही संघांचे लक्ष्य वेगवेगळे असतील. तीनपैकी तीन साखळी सामने गमावलेले श्रीलंका त्यांचा या स्पर्धेतील शेवटचा सामना अभिमानासाठी खेळेतील, तर न्यूझीलंड ज्याने दोन सामन्यांत एक विजय नोंदवला आहे, पुन्हा एकदा विजयाचा मार्ग शोधण्याचा निर्धार ठेवतील. न्यूझीलंडने जर श्रीलंकेवर मात केली तर त्यांना त्यांचा ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर बिघडलेला नेट रन रेट सुधरवण्याची सुवर्ण संधी आहे. तसेच त्यांची या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याची शक्यता बळकट होईल.

 

आमने-सामने

न्यूझीलंड आणि श्रीलंका एकमेकांविरुद्ध १३ आंतराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत, ज्यापैकी न्यूझीलंडने १२ जिंकले आहेत तर श्रीलंकेने फक्त एक. टी-२० विश्वचषकात, दोन्ही संघ अर्धा डझन वेळा आमनेसामने आले आहेत आणि त्या सगळ्या भेटींमधे न्यूझीलंडने वर्चस्व राखले आहे.

 

संघ

न्यूझीलंड: सोफी डीवाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, इझी गेज, मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, फ्रॅन जोनास, लेह कॅस्परेक, अमिलिया कर, जेस कर, रोझमेरी मायर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हॅन्ना रोव, लिया ताहुहू

श्रीलंका: चमारी अथापथु (कर्णधार), अनुष्का संजीवनी, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षिका सिल्वा, इनोका रणवीरा, हसिनी परेरा, कविशा दिलहरी, सचिनी निसानसाला, विश्मी गुणरत्ने, उदेशिका प्रबोधनी, अचिनी कुलसूरिया, सुगंदिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, शशिनी गिम्हानी, अमा कांचना

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवावे

अमिलिया कर: न्यूझीलंडच्या या प्रतिभावान अष्टपैलू खेळाडूने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिच्या मागील सामन्यात बॅट आणि चेंडूने उपयुक्त योगदान दिले. या उजव्या हाताच्या लेग स्पिनरने चार षटकात २६ धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत, या उजव्या हाताच्या फलंदाजाने त्याच सामन्यात ३१ चेंडूत २९ धावा केल्या.

रोझमेरी मायर: न्यूझीलंडच्या या उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामन्यांत सहा बळी घेतले आहेत. ती नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी करते आणि तिच्या संघाला लवकर यश मिळवून देते.

निलाक्षिका सिल्वा: श्रीलंकेच्या या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने या विश्वचषकातील तीन सामन्यांमध्ये तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. तिने ५९ धावा झळकावल्या आहेत ज्यात नाबाद २९ धावांच्या खेळीचा समावेश आहे.

सुगंदिका कुमारी: श्रीलंकेची ही डावखुरी फिरकीपटू या विश्वचषकातील तिच्या संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली आहे. तिने तीन सामन्यांत चार विकेट्स पटकावल्या आहेत. त्याचबरोबर तिची इकॉनॉमी सात पेक्षा कमी आहे म्हणजेच तिने विकेट्स घेण्याबरोबरच किफायतशीर गोलंदाजी देखील केली आहे.

 

 हवामान

जवळपास ४० अंश सेल्सिअस तापमानासह, उबदार हवामानाची अपेक्षा करा. सुमारे ३६% आर्द्रता आणि त्याचबरोबर भरपूर सूर्यप्रकाश असेल.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ११ ऑक्टोबर २०२४

वेळ: दुपारी ३:३० वाजता

स्थळ: शारजाह क्रिकेट स्टेडियम

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार