किन्हवली: शहापूर तालुक्यातील अर्चना ट्रस्ट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता ४ थी मध्ये शिकणारा श्रेयश रोठे याचा अबॅकस च्या ९ व्या नॅशनल लेव्हल स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे.
ठाणे येथे झालेल्या कार्यक्रमात त्याला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. शहापूर येथील अबॅकस सेंटरचा तो विद्यार्थी आहे. तर शहापूर तालुक्यातील याच अर्चना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिकणारा अर्णव विशे याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.