शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा

वासिंद: येथील खातिवली जिल्हा परिषद गटातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा शनिवार 20 सप्टेंबर रोजी झाला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य चेतन जाधव व सामाजिक कार्यकर्त्या सिध्दी जाधव यांच्याबरोबर २०० कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. होता. सनई लॉन्स, खातिवली येथे झालेल्या या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना तालुका पदाधिकारी दत्तात्रय ठाकरे व खातिवली-वासिंद सेवा सहकारी संस्था चेअरमन विलास पाटील यांच्या परिश्रमामुळे
या गटातील खातिवली येथील सामाजिक कार्यकर्ते चिंतामण वासुदेव जाधव यांच्या पुढाकाराने
भाजपा पंचायत समिती माजी सदस्य चेतन जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सिद्धी जाधव व इतर नवनियुक्त वासिंद ग्रामीण विभाग प्रमुख रघुनाथ मसणे यांच्या पुढाकाराने कातबाव-दहागांव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय भोर, माजी सरपंच सुरेश पवार व इतर तर खातिवली विभाग प्रमुख अंनता भोईर यांच्या पुढाकाराने वेहलोळी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार सोष्टे, भाजप कार्यकर्ते गुरुनाथ बाळू भोईर व इतर असे या विभागातील जवळपास 225 ते 250 राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व महिला कार्यकर्त्या यांनी शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला तर यावेळी पक्षातील काही नव्याने पदभार दिलेले कार्यकर्ते व महिला आघाडी कार्यकर्त्या यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उपनेते विश्वास थळे, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, ठाणे जिल्हा प्रमुख (ग्रामीण) कुंदन पाटील, उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे, महिला आघाडी जिल्हा संघटक रश्मी निमसे, आदिवासी कक्ष जिल्हा प्रमुख जानू हिरवे, तालुका विधानसभा संपर्क मिलिन्द देशमुख, विलास काबाडी, चेतन काबाडी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.