टी-२० विश्वचषकात आज कोण खाते उघडणार? स्कॉटलंड की वेस्ट इंडीज?

स्कॉटलंड आणि वेस्ट इंडीज संघांनी त्यांच्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या मोहिमेची सुरुवात एका पराभवाने केली. स्कॉटलंडने बांगलादेशविरुद्ध सामना गमावला, तर वेस्ट इंडीजने पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करलासाखळी टप्प्यात आणखी तीन सामने बाकी असून, हे दोन्ही संघ आपले सर्वोत्तम देण्याचे पूर्ण प्रयत्न करतील.

 

आमने-सामने

स्कॉटलंड आणि वेस्ट इंडीज एकमेकांविरुद्ध पहिला आंतराष्ट्रीय टी-२० सामना खेळणार आहेत.

 

संघ

स्कॉटलंड: कॅथरीन ब्राइस (कर्णधार), सारा ब्राइस, लोर्ना जॅक-ब्राउन, अब्बी एटकेन-ड्रमंड, अबताहा मकसूद, सास्किया हॉर्ले, क्लोई एबेल, प्रियनाझ चॅटर्जी, मेगन मॅकॉल, डार्सी कार्टर, आयल्सा लिस्टर, हॅना रेनी, रेचेल स्लेटर, कॅथरीन फ्रेझर, ऑलिव्हिया बेल

वेस्ट इंडीज: हेली मॅथ्यूज (कर्णधार), आलिया ॲलेन, शमिलिया कोनेल, डिआंड्रा डॉटिन, शीमेन कॅम्पबेल, अश्मिनी मुनिसार, ऍफी फ्लेचर, स्टॅफनी टेलर, शिनेल हेन्री, चेडियन नेशन, कियाना जोसेफ, झैदा जेम्स, करिश्मा रामहारक, मँडी मंगरु, नेरिसा क्राफ्टन

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

सास्किया हॉर्ले: स्कॉटलंडची ही ऑफ स्पिनर बांगलादेशविरुद्धच्या मागील सामन्यात तिच्या संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज होती. तिने दोन षटकात १३ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय, ती सलामीवीर म्हणून फलंदाजीत योगदान देऊ शकते.

सारा ब्रायस: स्कॉटलंडच्या या सलामी फलंदाजाने बांगलादेशविरुद्धच्या तिच्या मागील सामन्यात धावांचा पाठलाग करताना उत्कृष्ट खेळी केली. तिने ५२ चेंडूत ४९ धावांची नाबाद खेळी केली. त्याचबरोबरद ती यष्टीरक्षक म्हणून उत्तम कामगिरी करते.

स्टॅफनी टेलर: वेस्ट इंडिजच्या या माजी कर्णधाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील सामन्यात ४१ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या होत्या. या उजव्या हाताच्या टॉप ऑर्डर फलंदाजाने तिच्या डावात दोन चौकार आणि एक षटकार झळकावले.

ऍफी फ्लेचर: या वेस्ट इंडिजच्या लेग स्पिनरवर विरोधकांची धावांची गती रोखण्याचे आणि नियमित अंतराने विकेट घेणे ही दुहेरी जबाबदारी आहे. आतापर्यंत या स्पर्धेत फिरकीपटू प्रभावी ठरले आहेत आणि म्हणूनच तिच्या संघाला तिच्याकडून अव्वल दर्जेच्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल.

 

हवामान

सुमारे ३२ अंश सेल्सिअस तापमानासह हवामान उबदार राहण्याचा अंदाज आहे.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ६ ऑक्टोबर २०२४

वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता

स्थळ: दुबई आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार