तीन साखळी सामन्यांपैकी दोन जिंकल्यानंतर, दक्षिण आफ्रिका ‘ब’ गटातील गुणतालिकेत चार गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रन रेट १.५३ आहे. तथापि, प्रोटीजसाठी उपांत्य फेरीतील पात्रता अद्याप निश्चित नाही कारण त्यांच्या गटातील इतर दोन दावेदार, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांचेही चार गुण आहेत. त्यामुळे, दुबईत शनिवारी बांगलादेशविरुद्धचा विजय, उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी गतवर्षीच्या उपविजेतेसाठी सर्वोपरि असेल. दुसरीकडे, बांगलादेशचे तीन सामन्यांत दोन गुण आहेत आणि ते जिंकल्यास तेही चार गुणांसह इतर तीन संघांमध्ये सामील होऊ शकतात. तथापि, त्यांचा नेट रन रेट इतर तीन संघांपेक्षा कमी आहे. तो जर त्यांना सुधरवायचा असेल तर त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा विजय नोंदवणे अत्यावश्यक आहे. परंतु जरी तसे झाले तरी त्यांची या स्पर्धेत पुढे जाणायची शक्यता बिकटच राहील.
आमने-सामने
बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका एकमेकांविरुद्ध १४ आंतराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी बांगलादेशने दोन आणि दक्षिण आफ्रिकेने ११ जिंकले आहेत. टी-२० विश्वचषकात, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका दोनदा आमनेसामने आले आहेत आणि दक्षिण आफ्रिकेने दोन्ही वेळा विजयाचा झेंडा फडकावला आहे.
संघ
बांगलादेश: निगर सुलताना जोती (कर्णधार), नाहिदा अक्तर, मुर्शिदा खातून, शोर्ना अक्तर, रितू मोनी, शोभना मोस्तरी, राबेया खान, सुलताना खातून, फहिमा खातून, मारुफा अक्तर, जहानारा आलम, दिलारा अक्तर, ताज नेहार, शठी राणी, दिशा बिस्वास
दक्षिण आफ्रिका: लॉरा वूल्फार्ट (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसन, मिके डी रिडर, आयंडा ह्लुबी, सिनालो जाफ्ता, मारिझान काप, अयाबोंगा खाका, सुने लिस, नॉनकुलुलेको मलाबा, तुमी सेखुखुने, सेशनी नायडू, क्लोई ट्रायॉन
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
निगर सुलताना जोती: बांगलादेशच्या कर्णधाराने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिच्या मागील सामन्यात तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या या उजव्या हाताच्या फलंदाजाने ४४ चेंडूंत चार चौकारांसह ३९ धावा रचल्या.
शोभना मोस्तरी: बांगलादेशची ही उजव्या हाताची फलंदाज आतापर्यंत या स्पर्धेत चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आली आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत, तिने तीन सामन्यांत ३२ च्या सरासरीने ९६ धावा झळकावल्या आहेत.
लॉरा वूल्फार्ट: दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सामन्यांत ७१ च्या दणदणीत सरासरीने आणि ११७ च्या स्ट्राइक रेटने १४१ धावा केल्या आहेत. ही उजव्या हाताची सलामीवीर या विश्वचषकात (१० ऑक्टोबर २०२४ पर्यंत) सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे.
नॉनकुलुलेको मलाबा: दक्षिण आफ्रिकेची ही डावखुरी फिरकीपटू या स्पर्धेत (१० ऑक्टोबर २०२४ पर्यंत) तीन सामन्यांत आठ विकेट्स घेऊन सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. डावाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तिने शिस्तबद्ध गोलंदाजी करत विकेट्स पटकावल्या आहेत.
हवामान
सुमारे ३१ अंश सेल्सिअस तापमानासह उबदार हवामानाची अपेक्षा करा. आर्द्रता जवळपास ५६% असेल.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: १२ ऑक्टोबर २०२४
वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता
स्थळ: दुबई आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार