नऊ फुट लांब अजगराची सुटका

कल्याण : स्थानिक सर्पमित्रांच्या सहकार्याने भंडार्ली गावातील एका जनावरांच्या गोठ्यात लपलेल्या नऊ फुट लांबीच्या अजगराची सुटका करण्यात आली.

ठाणे वनविभागाच्या अंतर्गत ट्रान्सिट ट्रिटमेंट सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच निसर्गमुक्त करण्यात आले. अजगर गवताच्या पेंढ्यात आहे हे लक्षात येताच गोठ्याच्या मालकाने सर्पमित्रांना संपर्क केला. स्थानिक सर्पमित्र विजय राजभोर, विशाल कंथारिया, संतोष पंडागळे, कुलदीप चिकणकर यांनी गोठ्यातील अजगराचा शोध घेऊन वन विभागाच्या मार्गदर्शनाने निसर्गात मुक्त केले.