स्पर्धेच्या उत्तरार्धात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये उत्तरेकडे प्रवास करण्यापूर्वी बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 2024 चा शेवटचा वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) सामना होणार आहे. सोमवारी, ॲलिसा हिलीच्या यूपी वॉरियर्स, ज्यांनी त्यांचे शेवटचे दोन सामने जिंकले आहेत, स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी लढतील, जे त्यांच्या मागील दोन सामन्यांमध्ये पराभूत झाले होते.
WPL मध्ये आमने सामने
यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी एकमेकांविरुद्ध तीन सामने खेळले, त्यापैकी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दोन आणि यूपी वॉरियर्सने एक जिंकला आहे.
संघ
यूपी वॉरियर्स: अलिसा हिली (कर्णधार आणि यष्टिरक्षक), वृंदा दिनेश, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा, सोफी एकलस्टोन, श्वेता सेहरावत, राजेश्वरी गायकवाड, पूनम खेमनार, सायमा ठाकोर, अंजली सर्वानी, गौहर सुलताना, चमारी अटापाटु, लक्ष्मी यादव, डॅनियल वायट, सोप्पधंडी यशश्री
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: सोफी डिव्हाईन, स्मृती मानधना (कर्णधार), सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (यष्टीरक्षक), जॉर्जिया वेरेहॅम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका सिंग ठाकूर, शुद्रा, शुभा सतीश, इंद्राणी रॉय, श्रद्धा पोखरकर, दिशा कासट, नदीन डी क्लर्क, केट क्रॉस, एकता बिष्ट
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
ग्रेस हॅरिस: यूपी वॉरियर्सकडून खेळणाऱ्या धडाकेबाज ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने गुजरात जायंट्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला. तिने 33 चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 60 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली. तिने ऑफ-स्पिन गोलंदाजी करत तीन षटके टाकली आणि 21 धावा दिल्या.
सोफी एकलस्टोन: आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये असलेली जगातील नंबर एक टी-20 गोलंदाज गुजरात जायंट्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात यूपी वॉरियर्ससाठी सर्वात यशस्वी ठरली. या डावखुऱ्या फिरकीपटूने चार षटकात 20 धावा देऊन तीन गडी बाद केले. या स्पर्धेत तिने खेळलेल्या चार सामन्यांमधली ही तिची सर्वोत्तम गोलंदाजी होती.
एलिस पेरी: 100% तंदुरुस्त नसतानाही, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी सर्वाधिक धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिने 38 चेंडूंत पाच चौकारांसह नाबाद 44 धावा केल्या. तिने मध्यम गतीची गोलंदाजी करून दोन षटके टाकली आणि फक्त 10 धावा खर्च केल्या.
स्मृती मानधना: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची कर्णधार आतापर्यंतच्या स्पर्धेत तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिने चार सामन्यांमध्ये 139 धावा केल्या आहेत, ज्यात सर्वोत्तम 74 धावांच्या खेळीचा समावेश आहे. या डावखुऱ्या सलामीच्या फलंदाजाकडून तिच्या संघाला चांगली सुरुवात करण्याची अपेक्षा आहे.
खेळपट्टी
खेळपट्टी संथ असेल कारण गेल्या 10 दिवसांपासून तिची खूप झीज झाली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू धीम्या गतीने फलंदाजाकडे येणे अपेक्षित आहे ज्यामुळे धावा काढणे कठीण होऊ शकते, विशेषतः पहिल्या डावात. तथापि, या स्पर्धेत दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे दिसून आले आहे कारण धावांचा पाठलाग करणे जास्त यशस्वी ठरले आहे. सामन्याच्या उत्तरार्धात खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक अनुकूल होते, ज्यामुळे चेंडू बॅटवर सहज येतो.
हवामान
41% ढगांचं आच्छादन संध्याकाळी अंशतः ढगाळ स्थिती दर्शवते. आर्द्रता 34% असेल आणि तापमान सुमारे 24 अंश सेल्सिअस असू शकते. पावसाची शक्यता नाही.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: 4 मार्च 2024
वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता
स्थळ: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
प्रसारण: जिओ सिनेमा, स्पोर्ट्स 18