WPL २०२४ च्या अंतिम सामन्याच्या आठवणी घेऊन येतील RCB आणि DC

गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि दोन पैकी दोन अंतिम सामने खेळणारे दिल्ली कॅपिटल्स (DC) यांनी WPL २०२५ ची सुरुवात एक-एक विजयाने केली आहे. पण आज कुठल्यातरी एका संघाला पराभव पत्करावा लागेल. तो संघ कुठला असाल हे सोमवारी वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर होणाऱ्या चकमकीनंतर स्पष्ट होईल.

 

आमने-सामने

DC आणि RCB यांच्यात झालेल्या पाच सामन्यांपैकी DCने चार जिंकले आहेत तर RCBने केवळ एक (WPL २०२४ चा अंतिम सामना)

 

संघ

दिल्ली कॅपिटल्स: ॲलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासन, मारिझान काप, मेग लॅनिंग (कर्णधार), मिन्नू मणी, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), तीतास साधू, ॲनाबेल सदरलँड, एन चरनी, नंदिनी कश्यप (यष्टीरक्षक), सारा ब्राइस (यष्टीरक्षक), निकी प्रसाद

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: स्म्रीती मानधना (कर्णधार), सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (यष्टीरक्षक), जॉर्जिया वेरहम, श्रेयंका पाटील, रेणुका सिंग ठाकूर, एकता बिश्त, कनिका आहुजा, डॅनी वायट-हॉज, हेदर ग्रॅहम, किम गार्थ, चार्ली डीन, प्रेमा रावत, जाग्रवी पवार, जोशिथा व्ही जे, राघवी बिश्त

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

ॲनाबेल सदरलँड: दिल्ली कॅपिटल्सच्या आश्वासक अष्टपैलू खेळाडूने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तीन विकेट्स घेऊन प्रभावित केले. ऑस्ट्रेलियाची ही उजव्या हाताची वेगवान गोलंदाज त्या सामन्यात सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. याशिवाय, तिने मधल्या फळीत फलंदाजी करताना १० चेंडूत १३ धावा केल्या.

शफाली वर्मा: दिल्ली कॅपिटल्सच्या उजव्या हाताच्या सलामीच्या फलंदाजाने मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या चेंडूपासून आतिषबाजी करण्यास सुरु केली. तिने केवळ १८ चेंडूत ४३ धावा करून गोलंदाजांचा धुव्वा उडवला. त्या डावात या आक्रमक फलंदाजाने सात चौकार आणि दोन षटकार ठोकले.

रेणुका सिंग ठाकूर: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने गुजरात जायंट्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दोन विकेट्स घेऊन तिच्या WPL मोहिमेची सुरुवात चांगली केली आहे. तिच्याकडून केवळ नवीन चेंडूवर विकेट्स घेणेच नव्हे तर भैरवीच्या षटकांमध्ये धावांचा प्रवाह रोखणे देखील अपेक्षित असेल.

रिचा घोष: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या यष्टिरक्षक-फलंदाजने गुजरात जायंट्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाबाद ६४ धावा करत WPL मधील तिची सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. तिची निर्णायक खेळीत सात सुरेख चौकारांनी आणि चार उत्तुंग षटकारांनी सजली होती.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: फेब्रुवारी १७, २०२५

वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता

ठिकाण: कोटंबी स्टेडियम, वडोदरा

प्रक्षेपण: जिओहॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स नेटवर्क