काय स्म्रिती मानधनाचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विजयाची हॅट-ट्रिक नोंदवेल?

WPL 2024 चा सातवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 29 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असेल. एकीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने पहिले दोन सामने जिंकून धमाकेदार सुरुवात केली आहे तर दुसरीकडे मागच्या वर्षी असलेला उपविजेता संघ म्हणजेच दिल्ली कॅपिटल्स यांनी दोनपैकी एक सामना जिंकला आहे.

 

WPL मध्ये आमने सामने

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी एकमेकांविरुद्ध दोन सामने खेळले आहेत, आणि त्या दोन्ही सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला पराभूत केले आहे.

 

संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: सोफी डिव्हाईन, स्म्रिती मानधना (कर्णधार), सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (यष्टीरक्षक), जॉर्जिया वेरेहॅम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका सिंग ठाकूर, शुद्रा, शुभा सतीश, इंद्राणी रॉय, श्रद्धा पोखरकर, दिशा कासट, नदीन डी क्लर्क, केट क्रॉस, एकता बिष्ट 

दिल्ली कॅपिटल्स: शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, ॲनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राधा यादव, शिखा पांडे, पूनम यादव, तीतस साधू, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, अश्विनी कुमारी, अपर्णा मोंडल, स्नेहा दीप्ती

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

स्म्रिती मानधना: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या कर्णधाराने गुजरात जायंट्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 27 चेंडूत 43 धावांची प्रेरणादायी खेळी खेळली. या डावखुऱ्या सलामीच्या फलंदाजाने तिच्या मनोरंजक खेळीत आठ चौकार आणि एक षटकार ठोकला.

रेणुका सिंग ठाकूर: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने गुजरात जायंट्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकला. तिने गोलंदाजीची सुरुवात केली आणि तिच्या चार षटकांमध्ये 14 धावा खर्च करून दोन विकेट्स पटकावल्या. बेथ मुनी आणि फीबी लिचफिल्ड सारख्या प्रतिभावान ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तिने बाद केले.

मॅरिझान कॅप: दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू यूपी वॉरियर्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वोत्कृस्ट गोलंदाज ठरली. तिने आपल्या गती आणि स्विंगच्या जोरावर विरोधी पक्षाला हाणून पाडले. एका मेडनसह चार षटकांत फक्त पाच धावा देऊन तिने तीन गडी बाद केले. गोलंदाजीची सुरुवात करून आणि सलग चार षटके टाकून तिने तिचा स्पेल पूर्ण केला.\

शफाली वर्मा: निराशाजनक पहिल्या सामन्यानंतर, दिल्ली कॅपिटल्सच्या धडाकेबाज सलामीवीराने यूपी वॉरियर्सविरुद्ध 43 चेंडूत 64 धावा करून दमदार पुनरागमन केले. तिची अपराजित खेळी अर्धा डझन चौकार आणि चार षटकारांनी रंगली होती. तिने तिची सलामीची जोडीदार आणि कर्णधार मेग लॅनिंगसोबत 119 धावांची शानदार भागीदारी केली.

 

खेळपट्टी

फलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल राहील. नाणेफेक जिंकणारी कर्णधार प्रथम गोलंदाजी करू शकते कारण भरपूर धावा देणाऱ्या खेळपट्टीवर लक्ष्य जाणून घेणे नेहमीच चांगले असते. तसेच, मागील सामन्यांमध्ये असे दिसून आले आहे की वेगवान गोलंदाजांना सामन्याच्या सुरुवातीच्या काळात मदत मिळते आणि पॉवरप्लेमध्ये ते विकेट्स काढू शकतात.

 

हवामान

सुमारे 22 अंश सेल्सिअस तापमानासह थंड आणि हवेशीर संध्याकाळची अपेक्षा करा. ढगांचे आवरण राहणार नाही आणि पावसाची शक्यता नाही. आर्द्रता अंदाजे 39% असेल.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: 29 फेब्रुवारी 2024

वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता

स्थळ: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू

प्रसारण: जिओ सिनेमा, स्पोर्ट्स 18