म्युनिसिपल लेबर युनियनच्या अध्यक्षपदी पुन्हा रवी राव

ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील कामगार-कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या एकमेव मान्यता प्राप्त कामगार संघटना म्युनिसिपल लेबर युनियनची सर्वसाधारण सभा १५ फेब्रुवारी २०२५ रोजी युनियन कार्यालयातील स्व. अण्णा साने सभागृहात पार पडली. यावेळी कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष रवी राव यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
या प्रसंगी माजी नगरसेवक अशोक वैती, माजी नगरसेवक पवन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सभेत युनियन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली असून कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष रवी राव यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी कामगार नेते मोहन तिवारी तर उपाध्यक्षपदी बिरपाल भाल, बालू मुंडे यांची तसेच सरचिटणीसपदी चेतन आंबोणकर, सहाय्यक सरचिटणीसपदी आनंदा पावणे आणि कोषाध्यक्षपदी विजय खानविलकर तर चिटणीस पदावर नरेश पाटील, सुरेश इंगळे, उत्तम रामगुडे यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेच्या कामात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्यांची चिटणीस, सहाय्यक चिटणीस व कार्यकारिणी सदस्य पदावर निवड करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांनी या सभेला भरघोस प्रतिसाद दिला.
यावेळी माजी नगरसेवक अशोक वैती, माजी नगरसेवक पवन कदम आणि ॲड. रविंद्रन नायर यांची संघटनेच्या सल्लागार पदावर निवड करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष रवी राव कार्याध्यक्ष मोहन तिवारी उपाध्यक्ष बिरपाल भाल, सरचिटणीस चेतन आंबोणकर, कोषाध्यक्ष विजय खानविलकर यांनी मार्गदर्शन केले तर आनंदा पावणे यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.