नवी मुंबई: केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्क ४० टक्के वाढवल्याच्या निषेधार्थ शेतकरी, व्यापारी, आणि निर्यातदार यांनी बंद पुकारला आहे. त्यामुळे वाशीतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक घटून निम्म्यावर आली आहे. आवक घटल्याने दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली आहे. मंगळवारी बाजारात कांद्याच्या अवघ्या ५१ गाड्या दाखल झाल्या होत्या. त्यामुळे कांद्याच्या घाऊक दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली असून प्रतिकिलो २२-२५ रुपयांनी विक्री होत आहे अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४०% शुल्क लागू केले आहे. निर्यात शुल्क लादल्याने त्याचा कांद्याच्या दरावर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व बाजार समिती मधील व्यापारी संघटना आक्रमक झाले असून आणि जागोजागी आंदोलने केली जात आहेत. सर्वाधिक कांदा विक्री होणाऱ्या नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत सोमवार पासून कांद्याचा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे. त्याला पाठींबा देण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती गुरुवारी बंद ठेवण्यात आली आहे.मात्र या बंदचा परिणाम दिसत असून मंगळवारी बाजारात कांद्याची आवक निम्यावर आली आहे. दररोज एपीएमसीत १००हून अधिक गाड्या दाखल होतात, मात्र मंगळवारी बाजारात अवघ्या ५१ गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात १८-२२रुपयांनी विक्री होणाऱ्या कांद्याच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली असून २२-२५ रुपयांनी विक्री झाला आहे.
निर्यात शुल्काविरोधात राज्यात शेतकरी,व्यापारी यांनी पुकारला आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कांदा पाठविला नाही. त्यामुळे मंगळवारी बाजारात कांद्याची आवक निम्यावर आली आहे. परिणामी आज बाजारात कांद्याच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.